येता पावसाच्या सरी..
येता पावसाच्या सरी..
येता पावसाच्या सरी
धरतीवर पसरे आनंद लहरी
मातीचा सुगंध मन उल्हासित करी
पडे साऱ्यांचा विसर धुंद गार
वार्यासवे येई सृष्टीला बहर
येता पावसाच्या सरी
जग हे दिसे धूसर
थंडगार धुक्यासवे जाई लपून यात डोंगर
येता पावसाच्या सरी
धुंद होई सारा परिसर
रिमझिम बरसणाऱ्या सरी जणू गात असे मधुर स्वर
येता पावसाच्या सरी
तृप्त होई धरा
पाने-फुले पशुपक्षी सारेच सुखावती
तप्त मातीला अन् मनाला मिळे नवचैतन्य नवा गारवा
येता पावसाच्या सरी
वारा चंचल गंधित वार्ता सांगे कानोकानी
अल्लड मुलांना अन् साऱ्यांनाच ओलचिंब
कधीतरी व्हावसं वाटतं आपल्या अंगणी
येता पावसाच्या सरी
लतावेली चित्त भुलवी सुमने त्यावर रास करी
सृष्टीचे सौंदर्य खुलवे या बरसणाऱ्या सरी
