येत नाही
येत नाही
1 min
187
कोण आपले कोण परके
कधी कधी ठरवता येत नाही।
टोमणे,कधी भरभरुन कौतुक
मनाला समजून सांगता येत नाही।
आपल्याच भोवती असतात
आपलेच सगळे मुखवटे।
ओळखता कधी येत नाही
त्यातले किती खरे न किती खोटे।
दुःखात मात्र येतात सगळे धावून
अशीच असते नात्यांची गंमत
आसवे डोळ्यात मायेची घेऊन
तेंव्हाच कळते त्यांची किंमत।
मग वाटते आपलीच
असते नाती सगळी
सांगता येत नाही, प्रेमळ कधी
तर असतात कधी वेगवेगळी
असतात वेगवेगळी
