येणार पाऊस आता
येणार पाऊस आता
1 min
405
कानात हाक येते आनंदाचे गीत गाता
येणार पाऊस आता ,येणार पाऊस आता.
मी आभाळ हे पहातो, ढग रेंगाळलेले
येतो दाटून अंधार परी जीव आतुरलेले.
लाभेल सुगंध मातीचा परी जसा अमृता l
येणार पाऊस आता====
झाली रोमांचित काया ही आनंदाश्रु नयनात
सारे जमून आले मनाच्या या दालनात
मन सुखवी मनाला पावसाची वाट पहाताl
येणार पाऊस आता=====
आता नका मेघानो दोघात भिंत घालू
आनंदाने जलबिंदू सवे आम्ही सारे फुलू
तो गारवा माझा तीच माझी देवता ll
येणार पाऊस आ ता येणार पाऊस आताll
