ये परतून बालपण
ये परतून बालपण
असे असतेय रम्य बालपण
कुणीही नसते दुःखी उदास
हिंडा खेळा नाचा न् हुंदडा
बाह्य दिखाव्याची ना आस
कुणी मारले आणि ओरडले
वाटत नाही तो मानापमान
सत्कार कौतुक वा प्रशंसा
ना बालपणी कसला सन्मान
खाणेपिणे नि खेळण्यालाही
नसते कुणाचेच काही बंधन
दिवस नि रात्र तुमचीच असते
मुक्त बागडायला मोठे अंगण
ओझे वाटते हे मोठे असण्याचे
निंदा काळजी नि फक्त टेन्शन
नसावे परी हे फुकाचे प्रौढपण
बालपणीचे हे स्वच्छंदी प्राक्तन
विनविते देवाला मी मनापासून
द्यावे मजला फिरूनी बालपण
परतुनी भोगावे हे अल्लडपण
नको वाटतेय चिंतेचे तरुणपण
