ये मित्रा आज बसूया,
ये मित्रा आज बसूया,
ये मित्रा आज बसूया, मला खूप दुःख होतंय
सहा महिन्याची सुट्टी देणारे वर्ष मला सोडून जातंय...
रडून सांगू की ओरडून. जीव घुटतोय.
जा बाबा मी कोपरा पासून तुला हात जोडतोय
अश्रूचा पँक भरून तुला निरोप देतोय
म्हणे तू चिन्याच्या छोट्या भावाला जन्म दिला
व त्याच भावान सारा जगाला मोठा धक्का दिला.
मित्रा आज ये बसूया खरंच मला खूप रडू येतंय.
जो तो कोरोना सेंटर मध्ये जाऊन लढून येतय.
नष्ट होतोय की काय, ही मानव वस्ती,
टीयार पिच्या नावाखाली.
न्युज वाल्यांनी वाढवली होती भलतीच भीती.
माझा बाजूचा गुनू काका पण
जुरत होत ज्ञानदा कदम वरती.
दोन हजार विसने , मला खूप काही शिकवलं
भामट्यानी चार रुपयाच मास्क शंभरान विकलं.
अफवा लय उठवायचे भाड
वास नाय आला झाला कोरोना.
उलटी झाली झाला कोरोना.
पोटात दुखतंय झाला कोरोना.
वर्षेच्या बारा महिने सर्दी आहे
शिंखला तरी झाला कोरोना.
गप रहाना तुम्ही मारा आणि आम्हाला ही मरुद्या ना.
या करोना मुळे किती निष्पाप रस्त्यावर मेलेत
गरम पाणी पिऊन पिऊन थोंडात फोड आलेत
ये आज भावा काही तरी पिऊ माझं तोड सुकला.
मटणाचा रसा आणि तांदळाची भाकरी खाऊया.
वर्ष हरला आणि कोरोना जिंकला.
त्यानं तर त्याच दूर पिलू पण सोडलंय.
गरीब पोटावर हात असणाऱ्याचं कंबारट मोडलंय
खूप शिकवलं कोरोनान.
निचड गाववाल्यांनी आपली लायकी दाखवली.
आपल्यानी शेतात तंबू ठोकून अकल लढवली.
बायकोन जेवण कस बनवाच शिकवलं
भांडना पेक्षा भांडी घासन परवडलं
सर्दी होहू दे या शंभरहुन जास्त ताप ती सोबत होती.
तीचे अतूट प्रेम या मुळे उघडलं
भावा आज जरा बसू या खूप हिशोब आहेत
पिल्या नंतर उरखून टाऊया.
सरकारी दव्याची बॉटल नाही येणार.
एक कॉटर घेऊ, कोरोना दवा म्हणून गटगाट पिऊ.
कोणाला याच असलं प्याला त्यांनी भिंदास या.
येताना आपले पैसे सोबत घेऊन या
आणि हो पगार अर्धा येतोय महिन्याभरचा खरंच घरी ठेऊन या...
ये मित्रा आज बसू या...
