यातना
यातना

1 min

12
आस लागली भेटीची, वेळेला झाली घाई.
सैर मन माझ्या आधीच, पुढे धाव घेई.
इतक्यात पुन्हा सामोरे, करण्या रूप सामना.
नित्य घडो असेच दिन, आता काय ती हीच कामना.
परत पुन्हा तेच झाले, थोडे पाहिले थोडे बोललो.
लाजन्याच्या नादात अगदी, महत्वाचे तेच विसरलो.
विसरलो तो खरा, आठवन नित्य येते.
नेमके त्याच वेळेला, काळाची मती मरते.
वेळ तो केवढा, आता लवकर जातच नाही.
एक एक क्षण असा, पर्वतासारखा समोर ऊभा राही.
स्तब्ध उभा जागेवरी, भेटेल सरते शेवटी.
हव्याहव्याश्या यातना लाभल्या, त्या वेळेच्या पोटी.