STORYMIRROR

Supriya Devkar

Others

3  

Supriya Devkar

Others

यातना लेखनीत माझ्या दडलेली

यातना लेखनीत माझ्या दडलेली

1 min
11.5K

यातना लेखनीत माझ्या दडलेली 

आसवे कधी पदराआड रडलेली 

कसे उमटावे लेखनीने शब्द दमलेले 

वेदनेच्या तळाखाली शब्द जमलेले 

किती विसरावे दुःख तरी येई सामोरे 

दूर किती लोटावे ऊभे राही पाठमोरे 

नकोस ऊतरवू वेदना मनात लपलेली 

कधी साजंवातीसमोर डोळ्यात दिपलेली 

लेखनी तुझी विश्वासाने सजलेली 

शब्दांच्या सुगंधी कुपीत सदैव भिजलेली 

राहू दे अखंड अशीच रूजलेली 

येतील उदयाला अक्षरे गाजलेली


Rate this content
Log in