STORYMIRROR

Rohit Khamkar

Others

4  

Rohit Khamkar

Others

यारी

यारी

1 min
400

मला आठवते, आपन कॉलेजच्या पहिल्याच दिवशी भेटलो.

अपेक्षित अदबिची भाषा घेऊन, गप्पा मारत सुटलो.


आधार वाटायला लागला तूझा, कदाचित तुलाही वाटत असेल.

दुनियादारीला तरी काय माहीत, मैत्री आपली आयुष्यभर सोबत बसेल.



बसली ती एवढी खास की, इतका जवळचा झालास.

अगणित सुखांच्या सरी घेऊन, अगदी भावा सारखा आलास.



मजा मस्ती करणारा तूझा स्वभाव, आहे खूप हजरजबाबी.

मी तर हसून पागल व्हायचो, सगळ्यांना वाटायच आपणच हरामी.



कित्येकदा तुझ्याशी बोलताना, खदखदूना हसायचो.

डोळ्यात पाणी पोटात गोळा यायचा, तरी नाही सावरायचो.



मनमोकळं हसण्याचा आनंद, फक्त तूझ्या सोबत घेतला.

इतक हसलो मनमुराद, शेवटी रडण्यात जिव गुंतला.



सोबत तुझी असावी सतत, आवडते तुझी यारी.

एकच मित्र असा असावा, सगळ्या जगात भारी.


Rate this content
Log in