STORYMIRROR

Abhilasha Deshpande

Others

4  

Abhilasha Deshpande

Others

यालाच प्रेम म्हणायचं असतं

यालाच प्रेम म्हणायचं असतं

1 min
162

उगाचच्या रुसव्यांना

तू मला मनवायला

प्रेम म्हणायचं असतं


एकमेका आठवायला

आणि आठवणी जपायला

प्रेम म्हणायचं असतं


शब्दातून बरसायला

स्पर्शाने धुंद होण्याला

प्रेम म्हणायचं असतं


थोडंसं झुरण्याला

स्वतःचं न उरण्याला

प्रेम म्हणायचं असतं


भविष्याची स्वप्न रंगवत

आज आनंदात जगण्याला

प्रेम म्हणायचं असतं


कितीही रागावलं तरी

एकमेका सावरायला

प्रेम म्हणायचं असतं


तुझं-माझं न राहता

आपलं म्हणून जगायला

प्रेम म्हणायचं असतं


Rate this content
Log in