STORYMIRROR

Tukaram Biradar

Others

3  

Tukaram Biradar

Others

व्यथा

व्यथा

1 min
314

रात्रंदिवस कष्ट करून

मुलाला वाढवतात

आपल्या पोटाला चिमटा देऊन

मुलांची हौस पुरवितात

त्यांच्या डोळयात 

आपली स्वप्नन पाहतात. 

   मुले मोठी होतात

   आईवडीलांनी केेले

    ते उपकार नव्हे

    कर्तव्य समजतात 

     स्वत:च्या पायावर उभे राहतात

      नवी घरटी शोधतात.

तेव्हा आईवडील असतात 

कमरेत वाकलेले

डोळयातली स्वप्ने

डोळयातच ठेवून

परतीच्या प्रवासाला लागतात. 

    तेव्हा मुले लक्ष देत

     नाहीत आईवडीलाकडे

     त्यांचीच मुले मोठी होतात

      पुन्हा ते पण तसेच करतात

तेव्हा येते आपल्या आईवडिलांची आठवण. 

वेळ ही गेलेली असते. !!!!!. 


Rate this content
Log in