व्यथा स्रीजन्माची
व्यथा स्रीजन्माची
1 min
154
सरतेशेवटि नरदेहाची होतेच कि माती
मग का काढल्या इतक्या साऱ्या जाती. .
मुलगा जन्माला आला तर गावभर वाटतात साखर
मुलगी जन्माला आली तर कमीतकमी वाटावी तुपभाकर....
लग्नात हुंड्यासाठी सर्वस्व विकुन मुलीच्या घरी होते भिकार..
तरी कधी कधी सासरी मारझोडीची ती होते शिकार....
तिची व्यथा पाहुन ढसाढसा रडत असेल हि धरणी..
पण एकच मागणी समाजाची
स्त्रीने डोकं ठेवावं पुरुषांच्या चरणी.....
