STORYMIRROR

Manisha Wandhare

Others

2  

Manisha Wandhare

Others

व्यक्तिमत्व...

व्यक्तिमत्व...

1 min
72

समाजाने युगांयुगे माझी किती कुचंबना केली ,

सुंदर सुशील शांत व्यक्तिमत्व अशी अवलंबना केली ...

हासत लाजत सार काही मुकाट्यांने सहन करणार ,

पेटून उठले अन्याया विरुद्ध तर यांनीच लांछना केली ...

तो कोणता चित्रकार ज्यांने ओंजळीत फुले दिली,

हाती घेतले शस्त्र तर माझीच मागे प्रतारणा केली ...

वाचा फुटत चालली आता अन्याया विरुद्ध कुठे कुठे,

हे माणसा मीही माणुसचना बघ तूने सात्वंना केली ...

करूया समान हिस्सा अधिकारांचा या विश्वामध्ये ,

मगच मिळेल सम्मान जगण्याचा ही आराधना केली ...


Rate this content
Log in