STORYMIRROR

Kishor Zote

Others

3  

Kishor Zote

Others

व्यायामशाळा (सहाक्षरी)

व्यायामशाळा (सहाक्षरी)

1 min
12K

व्यायामशाळेत 

नियमित यावे

आरोग्याचे धडे 

येथे गिरवावे


शरीरसौष्ठव

दिसते शोभून 

पिळदार अंग

डोळ्यात भरून


व्यायाम ही व्हावा

भाग दिवसाचा

निरोगी शरीर

सार आयुष्याचा


नित्य थोडा वेळ

हालचाल करा

नव्या जीवनाची

वाट आता धरा


Rate this content
Log in