STORYMIRROR

Vasudha Naik

Others

4  

Vasudha Naik

Others

व्यायाम

व्यायाम

1 min
198

चला मुलांनो चला चला 

नित्य व्यायाम करू चला....


दोन हात गोल गोल फिरवूया

खांद्यांचा व्यायाम आपण करूया...


कर ठेवू कटीवरी उड्या मारूया

सर्वांग सुंदर असा व्यायाम करूया....


सूर्यनमस्कार बारा तरी घालूया

आपली पचनशक्ती छान सुधारूया....


श्वसनाचा भ्रामरी प्राणायाम करूया

स्वतःची स्मरणशक्ती आपण वाढवूया....


अनुलोम विलोम श्वसन प्रकार करूया

मानसिक शांतता आपण मिळवूया..


Rate this content
Log in