STORYMIRROR

Trupti Naware

Others

3  

Trupti Naware

Others

व्यासपीठ

व्यासपीठ

1 min
280

तु नसतास तर....

....तु नसतास तर

प्रितीत आसवांची

बरसली असती का सर..????

तु नसतास तर...

सजले नसते पुर्ण न होणाऱ्या

स्वप्नांचे स्वप्नघर...

तु नसतास तर....

थबकले असतेही मी

पाठमोरी वळल्यावर

पण...दिलीस असती

एक हाक जर

तु नसतास तर ..

तृप्त गारवा हिरवळीचा

सजला नसता

कवितेच्या उष्ण धरणीवर

तु नसतास तर....

चंद्र चांदण्या दुरावल्या असत्या

नदी सागराच्या ओळी नसत्या

कळल्या नसत्या व्यथा नि

लिहीले नसते कधीच वेदनेवर

आभार तुझे..नसण्याचे शतदा

मी राहीले नसते उभी व्यासपीठावर

तु नसतास तर...

तु नसतास तर....!!


Rate this content
Log in