STORYMIRROR

Dhananjay Deshmukh

Others

4  

Dhananjay Deshmukh

Others

व्याख्या चारोळीची

व्याख्या चारोळीची

1 min
250

रचना चार ओळींची सुरेख

मांडणी शब्दांची असते अल्प शब्दात

असली जरी शब्द संख्या कमी

असतात अर्थ खूप मोठे तिच्या उदरात...


अत्यल्प शब्द तिचा आकार 

यमक असते तिच्यावरचे अलंकार

दिसते गुटगुटीत नटलेली भारी

असुनही चारच ओळींची भासते निराकार...


उतरतात तिच्यात कुणाचे अश्रु 

तर भावना कुणाच्या तिच्यात सामावतात

नकळत घेते ती समजून वेदना 

तर अलगद कुणाच्या ओठी हास्य फुलतात... 


होते सुरुवात तिच्यात आयुष्याची  

शेवटही जीवनाचा तीच अलगद सांगते 

असते कधी तिची मैत्री शब्दांशी 

तर त्याच शब्दांशी ती खुपदा भांडते... 


अगणित भावनांची तीच तिजोरी 

सुख दुःखाचा साठा तीच सामावून घेते 

अशी असते चार ओळींची चारोळी 

जी अत्यल्प शब्दात सारे विश्‍व दाखवते... 


Rate this content
Log in