STORYMIRROR

Prashant Gamare

Others

4  

Prashant Gamare

Others

वय ते बागडण्याचे....

वय ते बागडण्याचे....

1 min
452



*_वय ते बागडण्याचे..._*


हट्ट धरुनी मिळवण्याचे,

लटकेच रुसून रडण्याचे..

जे मनास वाटे मागण्याचे,

असते वय ते बागडण्याचे..!


मायेची दुलई पांघरताना,

आईच्या कुशीत झोपायचे..

गोष्टी ऐकत परिकथेच्या,

बाबांच्या संगतीत घोरायचे..!


कंटाळा येता शाळेचा,

खोटेच आजारी पडायचे...

टळून जाता वेळ शाळेची,

हळूच बिछान्यातून उठायचे..!


भातुकलीचा खेळ मांडुनी,

राजासारखे वागायचे...

बसून राणीच्या शेजारी,

चोरट्या नजरेने बघायचे....!


जावून माळावरती उघड्या,

फुलपाखरांना पकडायचे...

दोरे बांधून पायाला मग,

हवेत अलगत सोडायचे...!


मित्रांसोबत हुंदडताना,

खोड्या काढत फिरायचे...

कट्टी-बट्टीच्या खेळातूनही,

रागाला त्या विसरायचे...!


बालपणीचा काळ सुखाचा,

आठवणींच्या सुंदर कोषातला..

नोकरीत हरवला आजघडीला,

वेचलेला तो क्षण आयुष्यातला..!


Rate this content
Log in