वय झाल
वय झाल
वय झाल आईच
तरी पहाटे उठून लगेच
ती कामाला लागते
तिच्या कार्याचे गणित काटेकोरपणे जुळवते
वय झाल म्हणून कसे चालेल?
मांडलेला हा संसार पसारा
एवढ्यात थकून कसे चालेल?
दिवसरात्र काबाडकष्ट करून
स्वतःकडे ती दुर्लक्ष करते
विचारले तर म्हणते, काही नाही नंतर सांगते
आपले प्राणपणाला लावून
कर्तव्य,जबाबदारी सर्व ती
व्यवस्थितरित्या पार पाडते
जिद्द, चिकाटी,अंगी ठेवून
शांत आणि समंजसपणे ती सर्वांशी वागते
मुलाबाळांची लग्न करायची,
नातवंडासोबत गंमत करायची
आनंदात दिवस घालवायचे
अस सार जगायच सोडून
आपण न करून कसे चालेल,
असे ही ती म्हणते
काही इच्छा, अपेक्षा आता उरल्याच नाही
झोपतांना डोळे बंद केले तरी
काळजीपोटी कुटुंबाच्या ती जागी असते
जे मिळवले ते सगळ्यांसाठी
ज्याचा त्याग केला तो सर्वांसाठी
उरलेले दिवस हसत- खेळत जगायचे
सुख द्यायचे, सुख घ्यायचे असे नेहमी म्हणते
मनाने जरी असे म्हटले की,
आता आपले वय झाले, घडून गेलेली
सुखद आठवण येता पुन्हा प्रफुल्लित ती होऊन जाते
वय किती झाल तरी
ह्रदयाला कधी सुरकुत्या पडत नाही
अशी जन्मदात्री आई
सार विश्व जिच ऋणी
वय झाल म्हणून ती कधी थांबत नाही
सदैव ती कार्यरतच असते...
