वसुंधरा
वसुंधरा
1 min
374
ऊन पाऊस वारा, सोसत आहे धरणी.
पुन्हा पुन्हा तोच नजारा, निसर्गाची करणी.
सगळीकडे हिरवळ, हिरवा शालू आईला.
पहिला पाऊस हा अलगद, सुगंध येतोय मातीला.
नाचतोय बळीराजा, आनंद इतका झाला.
आभाळाची चादर ओढून, लागलाय आता कामाला.
स्वच्छ हवा देखणं रूप, बदलत आहे ही कुस.
रूतू मागोमाग येती, मनमोहाला लागला अंकुश.
नाश केला आहे खूप, आता सगळ सावरूया.
वसुंधरा केव्हाची रडत आहे, बाळालाही कळू द्या.
आईचे आहे वैभव सारे, उपकार तिचे मानूया.
जतन सगळेच करू, माया पिढ्यानपिढ्या पाहूया.
