वसुंधरा नटली
वसुंधरा नटली
1 min
53
मेघ दाटले आकाशी
वसुंधरा ही नटली
सरी ही बरसणार
वीज पहा कडाडली
वारा झाला उतावीळ
गोष्ट कुणाची घेणार
मन मौजी आहे सदा
जणू मौज करणार
आता तपणारा सूर्य
शांत पाण्याने होणार
लाही अंगाची क्षणात
गार होऊन जाणार
मुलं-मुली अंगणात
लपाछपी खेळणार
कोणी काय तर कोणी
व्यस्त कामात होणार
शेतकरी माझा मात्र
लगबग सज्ज शेती
नांगरणी ही करून
काडीकचरा वेचती
