वसुधा सूर्य प्रेम
वसुधा सूर्य प्रेम
1 min
195
सजणा सजणी
फिरायला गेले
पावसाचे ढग
अचानक आले....
सूर्य डोईवर
तळपू लागला
पावसाचे थेंबी
नृत्यात रमला.....
उन्हात पाऊस
खूप खूश झाला
आमच्या तनूशी
खेळू ही लागला....
पानात चमके
जलबिंदू छान
हिरवाई दिसे
निसर्ग महान,...
सूर्य अन धरा
हाती हात घेती
गोल फेर धरी
प्रसन्नही होती....
