वसंतऋतु !!
वसंतऋतु !!
1 min
407
निळसर रंग हिरवे संग
ह्या वसंतात मी पाहिले
तनमन भुलवणी ह्या निसर्गात
मनमग्न करून टाकले!!धृ!!
सुरेख क्षण सुखात फुलते
निसर्गरंगात शोभुनी दिसते
थंड झुळूक ही वाऱ्याची भासते
गालातल्या गालात हळूच हसते!!१!!
राजा म्हणे हा ऋतूंचा
वर्षातून फुलवे कळी मनाचा
मनमोहक सुंदर सुशोभित हा
हास्य फुलवे चेहऱ्यावरचा!!२!!
वर्णावे तेवढे कमीच आहे
मन मोहणारे सगळेच आहे
कणकणात सुगंधीत पसरावा
असा वसंत दळवळत आहे!!३!!
