STORYMIRROR

Prashant Shinde

Others

4  

Prashant Shinde

Others

वसंत

वसंत

1 min
132

वसंताची रीत वेगळी

वसंताची रया आगळी

आनंदाने नाचती सगळी

तरीही प्रिया माझी फुगली


दवावरी मोती दिसती

चम चम करुनि हसती

झाडा झुडपा वरती

फुले पाने रंग उधळती


पहाटपारी पक्षी विहरती

भव्य नभांगण सारे व्यापती

चिव चिवटाची किलबिल करती

तृप्त करण्या सारी धरती


वसुदेवाची गोड मंजुळ वाणी

गल्लो गल्ली साद घालती

उंबरठ्यावर माय माऊली

लगबगीने दान ठेवती


पाणवठ्यावर माय लेकरे येती

वासरा साठी गायी हंबरती

आनंदाची जणू लाट उसळती

वसंताने नाहते धरती


कृपा किमया ही तुझी वासुदेवा

दोळाभरुनी सदैव आम्ही पाहतो

चरा चरातील वास्तव्य देवा

अंतरात सदा मी साठवतो....!!!


Rate this content
Log in