वसंत ऋतु महिमा
वसंत ऋतु महिमा
1 min
298
वसंत ऋतु आला घरोघरी
कोकिळा कुहु कुहु लागली करु
झुळ झुळ वारा वाहु लागला
सृष्टीला बहर येऊ लागला
पिवळ्या मोहरांनी आंबा नटला
बागेतील फुलांना फुलोरा आला
सर्व ऋतुंमध्ये वसंत माझा राजा
त्याच्या आगमनाने सर्वत्र झाला गाजावाजा
संगीतातही वसंताला आहे महत्त
सातसुरातुन बनला बसंत राग
ऐकल्यानंतर कळले वसंताचे सत्व.
