STORYMIRROR

Gangadhar joshi

Others

4  

Gangadhar joshi

Others

वसंत पंचमी

वसंत पंचमी

1 min
175

आला नाचत वसंत बहार

सृजनाचा नव अवतार


आम्र वृक्ष मोहर फु लती

कुहु कूहू कोकीळ बोलती

सुगंधा नी पक्षी डोलती

संजीवनी मंत्र घेवूनी

झाला तो साकार


जीर्ण पाने गळूनी पडती

नव पालवी उभार घेती

सृष्टीच्या नियमा प्रीती

नव युगाचा आविष्कार


किती पिढ्यांनी गायी ली गाणी

रती मदनाची होवूनी वाणी

पुष्प धनुष्य घेवून हाती

अळवती प्रणय शृंगार


ऋणानबंध दिले घेतले

प्रेमाचे ते गीत फुलवले

एकमेका साह्य करुनी

गावूनी संसार आभार


आला नाचत वसंत बहार

सृजनशील नव आविष्कार


Rate this content
Log in