वसंत फुलला मनोमनी..
वसंत फुलला मनोमनी..
वसंत फुलला मनोमनी
प्रेमरंगी बहरला,बहरला पानोपानी
पूर्व दिशा उजळली
लाली आभाळी दाटली
पसरले सप्तरंग अंबरी
पितांबर जणू झळकती क्षितिजावरी
ऋतुराज वसंत आला
नवतेज घेऊनी
धरणीने नवा पेहराव घातला
अन् स्वागत केले उत्साहानी
विणते पिल्लांसाठी
सुगरण घरटी देखणी
मंजूळ स्वरात कोकीळ
गात असे रानी
आला ऋतुराज वसंत आला
आनंद झाला मनोमनी
हिरव्या शालूवरती
लाल फुलांची वेलबुट्टी
बहरला गुलमोहर,
मोहरली सारी सृष्टी
उजाड माळरानात, गर्द, लाल केशरी रंगात
पळसाला आला बहर
आरास फुलांची पाहता
कोवळी कळी फुलली खांबावर
मोगर्याचा दरवळला मंदसा सुगंध
नेत्र दिपतात पाहूनी
हे अलौकिक लावण्य
अवतीभोवती अवखळ वारा
वाहे मंदधुंद
आला वसंत आला,आनंद झाला खरोखर..
