STORYMIRROR

Mrudula Raje

Others

3  

Mrudula Raje

Others

वसंत - गीत

वसंत - गीत

1 min
315

फुलला वसंत ऋतू 

आला आंब्याला मोहोर

सृष्टी प्रफुल्लित सारी

नाचतो अहा मनमोर


अंगणात आम्रतरूवर

फुलली लाल पालवी 

नव चैतन्याचे वारे

दु:ख- निराशा घालवी


कोकीळ साद घालतो

मन होई प्रफुल्लित

ओढ लागली जीवाला

प्रेम लाभावे गंधित 


प्रीत वसंत फुलला

अंग अंग रोमांचित

सृष्टीरंगाची उधळण

मनी भावना पुलकित


हृदयाच्या तालावर

आम्रतरूही डोलतो

सा-या चराचरामध्ये

धुंद मारवा गुंजतो


Rate this content
Log in