वसंत आला वसंत आला
वसंत आला वसंत आला
वसंत आला वसंत आला,
आला आला ऋतुराज,
तनी मनी आनंद पसरला,
हिरव्या लेण्यांचा बाज .
पानो पानी बहरूनी आला,
नाजूक साजूक हा साज,
भिर भिर करती फुलपाखरे,
सौंदर्यावरी त्या नाज .
ऐकून कोकिळेचे कूजन,
पक्ष्यांचे ते मधुर गुंजन,
गोड मधुर तो सुवास पसरे,
चैत्र पालवी ऋतू हासरे.
कोकिळेचे कुहू कुहू गाणे,
रंग पोपटी पसरत जाणे,
धुंद करी जरी, ऊन असे तरी,
मोगऱ्याचे ते फुलुनी येणे.
भरुनी दरवळ श्वासामधुनी,
सुगंधात त्या न्हाउनी जाणे,
रंगीबेरंगी फुलेही फुलती,
वसुंधरेचे नूतन लेणे .
वसंत मनी हा रोजच यावा,
सुगंधित हा करी शिडकावा,
दारो दारी गुढी उभारत,
वसंत ऋतू चे करू या स्वागत.
