वशीला
वशीला
1 min
180
नाव झाल मोठ, तशी काम झाली सैल.
ओळखीचा फायदा खूप, पेशा झाला मैल.
कामासाठी पाय झीझले, कीव कोना नाही.
केविलवान्या चेहऱ्या, साहेब हसत पाही.
दिवस भर फिरून, रडण्या जागा शोधी.
जागेपणी जगतोय, मरण यातना कोंडी.
काही असेच फिरतात, कामे लगेच होतात.
हसण्याची भाषा सगळी, बोलते आहे नोटात.
जडलाय सगळ्यांना एकच रोग, लागलेत सगळे नशेला.
जपून ओळखी करा, कामाला येईल वशीला.
