वर्तमानपत्र
वर्तमानपत्र
आले असतील आज आधुनिकतेचे दिवस ....
जगाने हि केला असेल कायापालट ....
पण आजपण तो टिकवून आहे अस्तित्व आपले ....
सकाळी त्याचा गट्टा छापून जागोजागी पसरतो ..
सकाळचा दिनक्रम त्याच्या वर नजर टाकूनच सुरु होतो ....
विविध बातम्यांनी तो भरले ला असतो
रंगीत शी पुरवणी पण तो बरोबर घेऊन येतो
अनेक लेख कथांनी कवितांनी हि तो सजलेला असतो ...
जगाच्या पाठीवर च्या बातम्या ची माहिती देतो ...
प्रत्येक पानाची खासियत असते ....
म्हूणन तो खूप जवळचा वाटतो .....
जग झाले असेल मॉडर्न ....
डिजिटल जे वेध हि सगळीकडे लागले असतील ....
पण त्याच्या अस्तित्वाला तेव्हाही महतव होते आज हि आहे आणि असणार ...
तो म्हणजे वर्तमान पत्र त्याचे अटळ स्थान अटळ राहणार ...
