वर्तमान
वर्तमान
1 min
172
डोक्यावर तळपता सुर्य येई
मी हसणारी गडबडीत जायी
तान्हुला धरती माझा हात
चटका झेलत हसत रहात
जरी झाडाची दिसती सावली
जाती लांब वाढती काहीली
जबाबदारी माझी हातात भविष्य
नजरेत हास्य साथी आयुष्य
गोळा माझ्या हातचा पोटचा
रुबाबात वाढवायचा नी चालवायचा
चिंता नाही आनंद आहे
वर्तमान माझा स्वानंद आहे
