STORYMIRROR

Manisha Awekar

Others

4  

Manisha Awekar

Others

वर्तमान पुढती

वर्तमान पुढती

1 min
167

वर्तमान सदा जाण

नको बघणेच मागे

भूतकाळ सरलेला

पुढे पुढेच चालावे    (1)


अगणित चुका होती

बालपणी न मोजावे

नको उजळणी मागे

पुढे पुढेच चालावे    (2)


शब्द ओठांवरी येती

निसटती वायुवेगे

पुन्हा नच मागे येती

पुढे पुढेच चालावे   (3)


चुके मार्ग जीवनात

दिशा वेगळीच मिळे

नवा मार्ग सापडता

पुढे पुढेच चालावे    (4)


जवळची प्रिय व्यक्ती

कधी चुकून दुखवे

क्षमा तत्काळ करुनी

पुढे पुढेच चालावे    (5)


जीवनाचे सूत्र सांगे

नच माघारी यायचे

मार्ग खुला पुढलाचि

पुढे पुढेच चालावे    (6)


साहित्याला गुण द्या
लॉग इन