वृश्चिक राशी
वृश्चिक राशी
1 min
216
अग ग ग... विंचू चावला
दाह यांचा सोसवत नाही
वृश्चिकेची माणसं बाई
सतत नांगी काढून राही
सारं ठेवतात मनात साचून
दिर्घद्वेषी असतात ही
नादी यांच्या लागू नका
खूपच उग्र वृश्चिक राशी
सरळ कधी बोलत नाही
फटकळ उत्तरं तयार असती
नजर यांची तीक्ष्ण करारी
विचार करूनी मैत्री करती
निमूटपणे करती कारस्थाने
स्वार्थ आपला हळूच साधती
तिखट वाणीने डंक मारती
अशी ही वृश्चिक राशी