Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Manisha Awekar

Others

3  

Manisha Awekar

Others

वऱ्हाडी झटका

वऱ्हाडी झटका

1 min
12.2K


तासनतास जीममधे

घाम गाळत बसायचं

काट्यावर उभं राहून

जड मनानं उतरायचं


तुम्हांला "बरं" जमतं !!

आम्हांला नाही बाई जमत!!


फुलामागे धावायचं

मर्यादेत मारायचं

शॉsssट ओरडायचं

जिंकल्यावर खुलायचं


तुम्हांला "बरं" जमतं

आम्हांला नाही बाई जमत


शब्दांमागे धावायचं

"इकडचं तिकडे" करायचं

"बरी झालीय कविता"

थंडपणे सांगायचं


तुम्हांला "बरं" जमतं !!

आम्हांला नाही बाई जमत!!


नित्यनेमे वाजवायचं

दुनियेला विसरायचं

डोलताना रमायचं

रमताना हसायचं


तुम्हांला "बरं" जमतं

आम्हांला नाही बाई जमत!!


नाजूक वाद्य घ्यायचं

खुंट्यांना पिळायचं

गज-बोटांना जपायचं

तालांसुरांत वाजवायचं


तुम्हांला "बर"जमतं

आम्हांला नाही बाई जमत


मी "बरी"आहे अशीच!!

ऐका सांगते खुशीत

मंत्र सांगते कानात

विचार करा मनात


पदार्थांत रमायचं

भरपूssर खायचं

हवं तेवढं लोळायचं

मनमुराद जगायचं


तुम्हांला "असं" जमतं??

आम्हांला बाई छाssन जमतं 


Rate this content
Log in