वृक्षतोड
वृक्षतोड
1 min
169
हिरवे हिरवे गार गालिचे
हाल चाली मुक्या जिवांचे
थोड्या अंतराने थोडा हिरवेपणा
वृक्षांना मिटवे बघ रुक्षपणा
संपलेल्या फांद्या उरलेला बुंधा
उल्लंघन करणारा होतो अंधा
सोडूनी जंगले जाती सारी
रिकामे छप्पर त्यांना मारी
हाकेच्या अंतरावर निसर्ग नाही
हताश होऊनी डोळे पाही
तोडातोड सगळी आता संपली
जीवघेणी साखळी चालू राहिली
