वृक्षारोपण
वृक्षारोपण
1 min
326
बदला दृष्टी
सुंदर सृष्टी
मनात होता
कशास कष्टी।।१।।
नव्हाळी नवी
फुटे पालवी
वृक्ष सावली
शीण घालवी।।२।।
परोपकारी
वृक्षवल्लरी
जात मानवी
निर्लज्ज सारी।।३।।
झाडे तोडली
वने जाळली
खिन्न उदास
धरा माऊली।।४।।
या सारे जण
करू आपण
या सृष्टी वर
वृक्षारोपण।।५।।
