वृक्ष लावा
वृक्ष लावा
1 min
316
छंद तुला रे छंद मला
धुंद होऊनी खेळू फुला
माझा होऊ दे गोड गळा
दूर पळू दे नाद खुळा
खोट्यास देऊ या तडा
गाऊ उद्याची गोड गाणी
झाडे उगवू देऊ पाणी
शिकवू या सुखाचा धडा
आज खपे तो उद्या सुखे
अग्नीतचि खुले रूपे
हिंमतीने खूप पळा
तू कमी न रे मी कमी
हात मिळविता ये हमी
फुलवू चल हरित मळा
