वंश...!
वंश...!
1 min
443
देवा तुझी करणी
नारळात ही वसते पाणी
वाटे मज तुझी
कौतुकाची ही करणी
उत्क्रांतीच्या वाटेवरती
कळीचे फुल तू करशी
मर्कटाचे रूप घालवून
मानवास जन्म सुंदर देशी
माझी वंशवेल तू
लीलया अशी वाढविशी
क्षणो क्षणी तुझ्या करणीने
अचंबित मज करशी
ज्ञान विज्ञान सारे सारे
नवनवे तू मुक्तहस्ते देशी
अजुनी किती रे देवा
लिलया आम्हां दावीशी
अनन्य भावे शरण
तुला रे भगवंता
तुझ्या लिलेस कोण जाणिल
सांग मला रे अनंता...!
