वनराई
वनराई
1 min
282
रमणीय
वनराई
शोभनीय
हिरवाई.
वॄक्ष नाना
छोटे बडे
छाया देण्या
सदा खडे.
तृण सान
मऊशार
स्पर्श त्याचा
अलवार.
लतावेली
फळे फुले
अवनीचे
रुप खुले.
रबर नि
मध मेण
वनांचीच
असे देण.
वनांमाजी
वाहे वारा
पर्जन्य नि
कधी गारा.
झाली जर
वने नष्ट
मानवास
अति कष्ट.
ठेऊ सदा
अखंडित
वनराई
अबाधित.
