वणवा
वणवा
1 min
262
वणवा पेटला
शब्दांचा मनी
गुंतत जातेय
आग लागी तनी....
थंड होते मग
शब्दांच्या बागेत
फिरताना मस्त
गार गार वार्यात....
शिडकावा शब्दांचा
वहीवर शिंपवला
काव्याचा सुगंध
अंतरी बहरला...,
चारोळी जमली
याच छान शब्दांची
मयूर पिसे फिरली
पल्लवीत आशांची....
वणवा शब्दांचा
पेटतच राहणार
याच शब्दबागेत
वसुधा रमणार....
