वंदे मातरम्
वंदे मातरम्
1 min
387
भारतभू
माझी माता
स्फूर्ती मिळे
गुण गाता.
संपन्नता
तिच्या ठायी
धनधान्य
नांदे पायी.
गंगा गोदा
देती पाणी
झुळूझुळू
त्यांची वाणी.
हळू डुले
शेत, मळे
गोड किती
फुले, फळे.
कैक जाती
धर्म नाना
एकतेची
बोली जाणा.
उगवते
इथे उषा
घेऊनिया
नवी दिशा.
भूमी अशी
सुजलाम्
तया माझा
हा प्रणाम.
