STORYMIRROR

Chandanlal Bisen

Others

3  

Chandanlal Bisen

Others

वन जतन

वन जतन

1 min
249

वनाचे करा जतन

हे वसुंधरेचे भूषण

मानवाचे महाप्राण

रक्षण आपुल्या हाती..


मानवा होरे निःस्वार्थ

अहम नकोरे व्यर्थ

जीवन कर रे सार्थ

रक्षण आपुल्या हाती..


निश्चय कर आता तरी

लावण्या झाड एकतरी

हा विचार रे हितकारी

रक्षण आपुल्या हाती..


दिधले संकेत निसर्गाने

घट झालिया वर्षा,ओझान

प्राणी तडपती पाण्यानं

रक्षण आपुल्या हाती..


भविष्यात रवी तेजानं

बर्फ जाईल वितळून

वसुंधरा होईल जलमग्न

रक्षण आपुल्या हाती..


Rate this content
Log in