STORYMIRROR

Prashant Shinde

Others

4  

Prashant Shinde

Others

वक्तव्य..!

वक्तव्य..!

1 min
355

लक्षात ठेवलीत ती 

2019 ची दोनच वाक्य

आठही दिशा गाजवत येणारी

लोभापायी राखण्या सख्य...


मनोवेधक एक त्यात

आम्ही विरोधात बसू

आणि दुसरे म्हणजे

लाज कशी वाटत नाही...


खरोखरच 2019

मस्त मजेत गेले

अंतरातम्याचे जणू

दर्शन आम्हा घडले...


मनसोक्त भडास

बाहेर पडता

चाळणीत फक्त 

निवडकच उरले...


आठवली मज ती

साधुसंतांची नामी युक्ती

एकवटले सारे आपणहून

कोणावरही न करता सक्ती...


निवडण्याचे कष्टच संपले

सारे कसे स्पष्ट झाले

झाले गेले गंगेला मिळाले

जनता जनार्दनास सारे कळले...


आता नवा विचार

आणि नवा आचार

जणू सज्ज झाले पुन्हा

घेण्या पुन्हा समाचार...


हा सूर्य हा जयद्रथ

हे ही एकदा उमजले

खरे घोडे कोठे पेंड खाते

हे पण लीलया समजले...


कळले वाघाची खाल असो की

असो साळसूदपणाचा बुरखा

वाटले मुहूर्तासाठी घड्याळ कशाला

हाती येता बिनकामाचा चरखा...


जणू म्हणे


घालीन लोटांगण वंदीन चरण

खाईन तूप भात अन् वरण

करेन पुन्हा पुन्हा भरण

नसता कोणतेच संयुक्तिक कारण...


हेच जे जे दिसले, जे जे पाहिले

ते ते चांगलेच लक्षात राहिले

लाज कशी वाटत नाही ऐकता

ते सारे कायमचे मनात ठसले...


म्हणून तर 2019 वाटते मज

बरेच काही देऊन, घेऊन गेले

जाता जाता नवनवे विचारही

मनात चांगलेच पेरून गेले...


वर्ष सरता सरता

दिसते तसे नसते हे पटले

सत्य सत्य म्हणतात ते काय

हे ही प्रत्ययास लीलया आले...


आणि


जे होते ते चांगल्याचसाठी

हे ही काही खोटे नाही ते पटले

दिलेला शब्द ते पाळत नाहीत हे सत्य आहे

ती दन्तकथा नाही बाबा हे कळले..!


Rate this content
Log in