वजीर मी शरीराचा
वजीर मी शरीराचा
वजीर मी तुमच्या शरीराचा
माझ्याशी पंगा घ्याल तर हकनाक जीव जायचा
ठेवा मला व्यवस्थित सांभाळून
घ्या माझी काळजी
फास्टफूडच्या या दुनियेत
नकाना शरीराला गहाणवट टाकू
सकस अन्न, शुद्ध हवा,प्रदूषण मुक्त जीवन
घ्याना भरपूर उपभोगून
हांं त्यासाठी मात्र तुम्हाला
घ्यावे लागतील थोडेसे प्रयास
झाडे लावूनी झाडे जगवा
धरतीची धूप थांबवून
शुद्ध गारवा,पाणी मिळवा
पटतंय का माझं म्हणणं?
देतोय मी सावधानतेचा इशारा
तुमच्या शरीराची मलाच काळजी
कारण,मी आहेना तुमच्या शरीराचा वजीर
वजीर करतो राजाचं रक्षण
मी करतो तुमच्या शरीराचं रक्षण
सावध होऊनी,निरोगी जीवन जगूया
हसत-खेळत मौल्यवान आयुष्य घालवूया
