वियोग एक संकट
वियोग एक संकट
1 min
237
साहावा लागणार वियोग
खंत आहे आज मनी
चूक कुणाची होती हे
मात्र नाही खरोखर ध्यानी
भ्रम होता मजला वाटत
कळतो भावनांचा अर्थ
सख्या तुला माझ्या
परी सारे ते होते व्यर्थ
कधी सुटले हातातले हात
ज्यांनी धुडकावलें अनेक संकट
बहूतेक भिंतीही कंटाळल्या
ऐकून रोजचीच आपली कटकट
एक काळ होता सुरेख
जुळलें आपले सुरात सूर
आज नको वाटतोय सहवास
करतोय एकमेकांना दूर दूर
कुठेच किन्तु परन्तु नव्हते
आकंठ बुडालो दोघे प्रेमात
निभाव लागणार विलग होऊन
होतो आजवर गोड मिठीत
भेट म्हणून देऊ आठवणी
भौतिक सुखे नीरस होती
होते जरी मतभेद विचारांचे
परी वियोग दुरावणार नाती
