विवेकी श्रद्धा
विवेकी श्रद्धा
1 min
188
ती
वांझ म्हणून निखाऱ्यावर चालणारी
तो
गुप्तधनासाठी नरबळी देणारा
कधी तो कधी ती ,
कधी आपण गोळा करत राहतो ,
अज्ञानाचे सरपण
त्यावर शिजतो खोटा विश्वास
आणि रांधतो खोटा विकास
श्रद्धेचा बुरख्यात खोटा आधार
कौल आणि करणीवर खोटीच मदार
दुनियेच्या बाजारात फक्त पैसाच बोलतो
तोच बुवा आणि बाबांना बोलवितो
हे जाणूनही सगळे आंधळे
आपल्या श्रद्धेला करतात पांगळे
नष्ट करावे अज्ञान , विवेकाने
कार्य करावे , संपूर्ण विचाराने
अंधश्रद्धा ह्या शापाला उशाःप नाही
येणार पिढीला हे संचित द्यावयाचे नाही
