STORYMIRROR

Umakant Kale

Others

4  

Umakant Kale

Others

विठू माऊली

विठू माऊली

1 min
381

माझी ही विठू माऊली ! बघा आईची सावली !

संकटात ती धावली ! झालो नतमस्तक  !!


भक्ती तुझा रे गजर ! पुण्याईची तू घागर !

चाले कर्माचा नांगर ! मग्न असा रे झालो !!


लागे मला तुझी ओढ ! तुझ्याविना नाही गोड !

संसाराचा असा लोढ ! देवा कसा मी तारु !!


तुझी वाट आहे दूर ! सांग कुठे ते मंदिर !

नाही उरला रे धिर ! विठ्ठल रे विठ्ठल !!


नाही तू कसा दिसला ! नाही तू मला बोलला !

असा का तू रे वागला ! झाली काय रे चूक !!


नको अंत माझा पाहू ! तुझ्याविना ना रे काहू !

लागे माझा श्वास जाऊ ! तरी विटेवर तू !!



Rate this content
Log in