STORYMIRROR

शिवांगी पाटणकर

Others

3  

शिवांगी पाटणकर

Others

विठू माउली

विठू माउली

1 min
219

हात ठेवूनी कटेवरी

राहिला उभा विटेवरी

विठ्ठल वसे पंढरपुरी


घेऊनी निघे वारकरी

पालखी जाई पंढरी

एकादशीला होई वारी


सारे शरण तुजला जाई

सकळांसी लाभली आई

साऱ्यांची विठ्ठल रखुमाई


माथा ठेवितो तुझ्या पाऊली

संकटात येशील धावुनी

माझी विठू माऊली


Rate this content
Log in