विठु माऊली
विठु माऊली
1 min
23.3K
आज धन्य झालोय लावुनिया
कपाळी तुझाच़ हा रंग
खास़ तुझ्यासाठी मी
लिहिला देवा एक अभंग ||
तू दिलेली मला ही वाच़ा
बनवला हाडामासांचा
हा माझा भलामोठ़ा साचा ||
मद्त करतोय मला
घ्यायला तु प्रत्येक श्वास
तुच दिलाय पारिजातकाला
पण छानसा वास ||
तुझेच नाव राहावे
नेहमी माझ्या तोंडि
तुच़ सोडवतो नेहमी तोडुन
संकटांची हि कोंडी||
करावया तुझी हे त्रैलोक्याच्या
स्वामी निस्सिम भक्ति
मला तमा नसेल सोडावयास या
भौतिक जगाची आसक्ति ||
तुची मायबाप़ सखा सवंगडी माझा
खरंच आहेस तू साऱ्या ब्रम्हांडाचा राजा ||
