विठ्ठला प्राण तळमळले
विठ्ठला प्राण तळमळले
करोनाच्या लाटेने जनजीवन विस्कटले
मानजीवन पुरते अंधकारमय झाले
शाळा मंदिरांची दारे बंद झाले
भारतीयांचे जनजीवन पुरते कोलमडले
विठ्ठला प्राण तळमळले
अर्थशास्त्राचे गणित बिघडले
शिक्षणाचे तीन तेरा वाजले
उद्योगधंदे ही ठप्प झाले
शेतकऱ्याचे तर वाळवणच केले
विठ्ठला प्राण तळमळला
पहिल्या लाटा दुसऱ्या लाटा
लाटांच्या भीतीने थैमान झाले
कोरोनारूपी सागरात जिव वाहिले
भूकमारीने जीव कासावीस झाले
विठ्ठला प्राण तळमळले
राजकारण्यांने वेगळेच केले
त्यांनी लसीचे दुकानच मांडले
काळ्या बाजारात नेऊन विकले
पैसे वाल्यांनी विकतही घेतले
गरीब जनता उपाशीच मेले
बघावीशी वाटेना स्मशानातली वादळे
विठ्ठला प्राण तळमळला
